Accident News : माळशेज घाटात भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी, वाहनांचा अक्षरशः भुगा…

Accident News : राज्यात अलीकडे अपघाताच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. नगर -कल्याण महामार्गावर माळशेज घाटात भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि दुधाच्या ट्रॅंकरने समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला आहे.

या अपघातात चार जण ठार झाले असून दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हे सगळे पांगरी गावाचे रहिवासी असून जखमी झालेल्यांमध्ये दोन वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.
अक्षय शांताराम दिघे (वय. ३३) तेजल अक्षय दिघे (वय.२६ रा.पांगरी तर्फे मढ)व टँकर चालक दत्तात्रय किसन वामन (रा.पिपळवंडी )हे जागीच ठार झाले असून ४०७ टेम्पो चालक शकील अमजत शेख (रा. बादशाह तलाव, जुन्नर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. Accident News

सविस्तर माहिती अशी की, दिघे दामंपत्य नातेवाईकाच्या लग्न निमीत्त गावी आले होते ते शुक्रवारी दुपारी परत मुंबई ला दुधाच्या टँकर मध्ये माळशेज मार्गे कल्याण ला जात असताना कल्याण बाजू कडून जुन्नर बाजूला येत असलेल्या मालवाहू ४०७ टेम्पो ची नगर-कल्याण महामार्गावर आवळ्याची वाडी येथे समोरासमोर धडक झाली.

ही धडक एवढी भिषण होती की या अपघाता टँकर रस्त्याच्या खाली होऊन टँकरवरील दुधाची टाकीही तुटून बाजूला झाली. तर मालवाहू पिकअप चे ही मोठे नुकसान झाले. या अपघातात दिघे दामंपत्य जागीच ठार झाले. तसेच टँकर चालक ही जागीच ठार झाला.