Baramati : बारामतीत ‘इमोशनल इम्पॅक्ट’ ला पडतोय बारामती विकासाचा कॉम्पॅक्ट भारी..!!


Baramati : बारामती मतदारसंघात सध्या मोठी लढत बघायला मिळत आहे. याठिकाणी पवार कुटूंबातच सामना आहे. या मतदासंघात नणंद विरुद्ध भावजय असा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्या लढतीत कोणाचा विजय होणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याने या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मागील तीन टर्म खासदार म्हणून अनुभवी उमेदवार अशी ओळख आणि जोडीला शरद पवार यांच्याप्रती असलेल्या सहानुभूतीमुळे निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळात सुप्रिया सुळे यांचे पारडे जड मानले जात होते.

मात्र, प्रचार जसजसा पुढे जात गेला, तसा सुनेत्रा पवार यांनी ‘टॉप गिअर’ टाकल्याचं पाहायला मिळाले. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारातील काही महत्त्वाच्या फॅक्टर्समुळे ही लढत रंगतदार झाली आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर बारामतीत शरद पवार यांच्याप्रती असलेल्या सहानुभूतीमुळे सुप्रिया सुळे यांच्यासाठी पोषक वातावरण तयार झाल्याचे बोलले जात होते.

तसेच गेल्या तीन दशकांपासून राजकारणात सक्रिय असलेल्या आणि पक्षसंघटनेत झोकून देऊन काम करत असलेल्या अजित पवारांनी ही परिस्थिती ओळखली आणि प्रभावीपणे आपले मुद्दे मांडण्यास सुरुवात केली. बारामतीची निवडणूक भावनिक आधारावर न होता विकासाच्या मुद्यावर व्हायला हवी, अशी भूमिका अजित पवारांनी अगदी सुरुवातीपासूनच मांडली. Baramati

तर दुसरीकडे, मी निवडून आल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला कसा हातभार लावेन, हे सुनेत्रा पवार यादेखील ठामपणे जाहीर सभांमधून मांडू लागल्या. परिणामी या निवडणुकीचाकेंद्रबिंदू हळूहळू भावनिकतेकडून विकासाच्या मुद्याकडे सरकण्यास मदत झाल्याचे निरीक्षण राजकीय जाणकार आता नोंदवू लागले आहेत.

अजित पवार विरुध्द सुप्रिया सुळे

शरद पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि पुतणे अजित पवार यांच्याकडे सुरुवातीपासून पाहिले जाते. शरद पवार यांनी निवडणुकीच्या राजकारणापासून स्वत:ला वेगळे ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुप्रिया सुळे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांचे नेतृत्व आणखी ठळकपणे लोकांसमोर आले. जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष एकसंघ होता, तोपर्यंत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या दोघांचंही नेतृत्व मान्य केले होते.

मात्र संघटनेतील पहिल्या फळीतील नेत्यांपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम हे प्रामुख्याने अजित पवारांच्या माध्यमातूनच होत होते. त्यामुळे राष्ट्रवादीतील फुटीनंतर बहुसंख्य नेते आणि कार्यकर्ते अजित पवारांसोबत राहिल्याचे पाहायला मिळते.

बारामती लोकसभा मतदारसंघातही असंच चित्र आहे. उद्याच्या काळात आपल्या एखाद्या प्रश्नाची सोडवणूक करायची असेल तर आपल्याला अजित पवारांकडेच जावे लागेल, अशी काहीशी भावना कार्यकर्त्यांमध्ये तयार झाली आहे. याचा फायदा बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!