Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर जहरी टीका, म्हणाले, राष्ट्रवादीतून फुटून गेलेले पाकिटमार आणि…

Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवारांसह फुटून गेलेले सगळेजण पाकिटमार आणि दरोडेखोर आहेत, अशी जहरी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तसेच त्यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर टीका केली आहे.

तसेच त्यांनी बुधवारीही अजित पवारांवर टीका केली होती. अजित पवार यांनी मुलींच्या जन्मदरावर बोलताना द्रौपदीचं उदाहरण दिलं होतं. त्यावर विचारलं असता अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं असं म्हटलं होतं. आता त्यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर टीका केली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, अजित पवार हे उघडपणे सांगू शकतात की मी मोक्काचा आरोपी मी सोडवला. तसंच त्यांनी महाराष्ट्रातल्या स्त्रियांबद्दल जे द्रौपदीचे वक्तव्य केले तो किती विषारी विचार आहे.

महाभारत वाचल्यावर समजत नाही का काय लिहिले आहे द्रौपदीबद्दल? आजच्या लेकींना द्रौपदी म्हणणं हा कुठल्या स्तरावरचा विचार आहे? समस्त स्त्री वर्गाचा अपमान अजित पवार यांनी केला आहे. त्यांची मानसिकता अशीच आहे असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. Jitendra Awhad
एकनाथ शिंदे जेव्हा पळून गेले तेव्हा अजित पवारही पळून जाण्याच्या तयारीत होते. त्या पलायनात माझ्या बरोबर सहभागी व्हा अशी अजित पवारांची मानसिकता होती. त्यांनी सगळ्यांना जमवले. त्यातले काही जण अजित पवारांसह पळायला तयार झाले.
आमच्यातले काही लोक होते ज्यांचे पाय लटपटत होते, त्यातला एक होता प्राजक्त तनपुरे त्याने सही करणार असे म्हटले होते. मात्र बाहेर येऊन मला म्हणाला की मी यांच्याबरोबर जाणार नाही. मी शरद पवारांबरोबरच आहे.
ते सगळे झाल्यावर मला जयंत पाटील म्हणाले की मी वेडा माणूस नाही, हे पत्रच मी शरद पवारांना देणार नाही. शरद पवारांना एकटे पाडणार नाही. असे त्यांनी म्हटले होते. हे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीचा भाजपासह जाण्याचा ठराव झाला होता का? यावर आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिले.