कॉग्रेस नगरसेवकाच्या मुलीची कॉलेज कॅम्पसमध्ये धारदार शस्राने हत्या ! कर्णाटक मध्ये घटलेल्या घटनेने उडाली प्रचंड खळबळ.. !!


हुबळी : कर्नाटकात एक हैराण करणारी घटना घडली आहे. याठिकाणी एकतर्फी प्रेमातून २४ वर्षीय युवकाने कॉलेज युवतीची हत्या केली आहे. ही युवती केएलई टेक्नोलॉजिकल यूनिवर्सिटीत शिकत होती.

धक्कादायक म्हणजे ही घटना कुठल्याही निर्जनस्थळी झाली नाही तर ती  कॉलेज कॅम्पसमध्ये भरदिवसा घडली आहे. त्यात सनकी प्रियकर युवतीवर      चाकूने वार करताना दिसतो.

फय्याज असे या आरोपीचे नाव असून हल्ल्यात जखमी युवतीला तातडीने कॉलेजजवळील रुग्णालयात उपचारासाठी नेले परंतु रस्त्यातच तिने शेवटचा  श्वास घेतला. आरोपी युवक हा त्या कॉलेजमध्ये शिकत नव्हता तरी त्याने कॉलेज कॅम्पसमध्ये घुसून मुलीवर जीवघेणा हल्ला केला. प्रत्यक्षदर्शीनुसार, युवतीवर चाकूने सपासप वार करण्यात आले. त्यानंतर आरोपी फय्याज पळून जाण्याचा प्रयत्न्य करत होता परंतु  तिथल्या काही युवकांनी आणि कॉलेज कर्मचा-यांनी त्याला पकडले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाले केले .

मृत युवतीचे नाव नेहा हिरमेठ असून ती काँग्रेस नगरसेवकाची मुलगी होती. तर आरोपी युवक फय्याज कोंडीकोप्पा बेळगाव जिल्ह्यातील सवादट्टी इथे राहणारा होता. पोलिसांच्या माहितीनुसार, नेहा गेल्या २ महिन्यापासून कॉलेजला जाऊ शकली नाही. कारण ती आजारी होती. गुरुवारी परीक्षा देण्यासाठी ती कॉलेजला पोहचली होती. परंतु त्याचदिवशी तिच्यावर हल्ला करण्यात आला. नेहा परीक्षा देऊन वर्गाबाहेर पडली तेव्हा तिथेच उभ्या असणा-या फय्याजने तिच्यावर चाकूहल्ला केला. तिच्या पाठीवर, मानेवर चाकूचे वार झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात ती खाली कोसळली.

युवक आणि युवती हे दोघे एकत्र यूजी हा कोर्स करत होते. तिथेच दोघांची मैत्री झाली. परंतु फय्याजने मैत्रीलाच प्रेम समजले. त्याने नेहा प्रपोज केला. त्यावर नेहाने नकार दिला. तेव्हापासून नेहा त्याला टाळण्याचा प्रयत्न करत होती. नेहाने तिच्या घरच्यांना हा प्रकार सांगितला, तेव्हा तिच्या घरच्यांनी फय्याजला नेहापासून दूर राहा असे खडसावले. त्याघटनेपासून आई वडील मुलीला कॉलेजमध्ये नेण्यापासून आणण्यापर्यंत सोबत असायचे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!