उपोषण करुन प्रश्न सुटत नाहीत ! जरांगे पाटील यांना पंकजा मुंडेंचा थेट सवाल ..!!


Pankaja munde : मराठा समाजाने आरक्षणाचा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. जोपर्यंत ओबीसीं मधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही ? अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. पण भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीदेखील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. पण आता पंकजा मुंडे यांनी माघार घेतलेली दिसत आहे .
सध्या अनेकजण उपोषण करत आहेत. पण उपोषण करून काहीही मिळत नाही अशी टीका पंकजा मुंडे यांनी जरांगे पाटलांचं नाव न घेता केली आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पंकजा मुंडेंच्या या टीकेवर आता जरांगे पाटील कशाप्रकारे उत्तर देतात? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.

पुढे त्या म्हणाल्या की ? बीड जिल्ह्यातील कोणताही व्यक्ती माझ्या दारावर आला असता तर मी कधीच त्याला त्याची जात विचारली नसती. प्रत्येकाला मी मदत करत आले आहे. निवडणुकीत राजकारण आणायची गरज नाही. माझ्या हातात तराजू असून मी उज्ज्वल भविष्यात अडचण आणणारी परिस्थिती पाहत आहे.