मोदींच्या गॅरंटीचे प्रमुख पाच मुद्दे काय आहेत ! भाजपकडून जाहिरनामा प्रसिद्ध ..!!
bjp manifesto 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचा (BJP) जाहीरनामा प्रसिद्ध केला. ‘मोदी की गारंटी’ असे या जाहीरनाम्याला नाव देण्यात आले आहे. यामध्ये अनेक प्रकारची आश्वासने देण्यात आली आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात युवक, शेतकरी, महिला इत्यादींच्या कल्याणासाठी कार्यक्रम राबविण्याचे सांगितले आहे.
मच्छीमारांसाठी विमा सुविधा उपलब्ध करून देण्याचे आणि धान्य (भरडधान्य) सुपरफूड म्हणून विकसित करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.
पीएम मोदींनी भाजपचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. संकल्प पत्राच्या नावाने जारी करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये रामायण उत्सव साजरा करणे, अयोध्येचा पुढील विकास, भ्रष्टाचाराविरोधात कारवाई आदी आश्वासने देण्यात आली आहेत. सत्तेत परत आल्यास देशात न्यायालयीन संहिता लागू करण्याचे
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात पाच मोठी आश्वासने दिली.
2029 पर्यंत गरिबांसाठी मोफत रेशन योजना देण्याचे वचन.
आयुष्मान योजनेंतर्गत 70 वर्षांवरील वृद्धांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्याचे वचन.
मुद्रा योजनेअंतर्गत कर्जाची मर्यादा 20 लाख रुपये असेल.
गरिबांना 3 कोटी घरे दिली जातील.
एक राष्ट्र, एक निवडणूक आणि समान मतदार यादी प्रणाली सुरू केली जाईल