Pune Crime : दहावीचा पेपर देऊन निघालेल्या तरुणावर हत्याराने वार, कात्रज परिसरातील धक्कादायक घटना..


Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

दहावीचा पेपर देऊन घरी निघालेल्या तरुणाला शिवीगाळ करुन हत्याराने मारहाण करुन जखमी केल्याची घटना कात्रज परिसरात घडली आहे. ही घटना मंगळवारी (ता.२६) दुपारी दीडच्या सुमारास कात्रज कोंढवा रोडवरील कृष्णा सागर हॉटेल समोर घडली आहे. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. Pune Crime

याप्रकणी संतोषनगर, कात्रज येथे राहणाऱ्या १७ वर्षीय मुलाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमिन मुल्ला, आयान शेख, तनवीर शेख व आबु रेहमान यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, मृणाल मंगळवारी दहावीचा पेपर सुटल्यानंतर घरी जात होता. त्यावेळी आरोपीने त्याला हाक मारुन थांबवले. आरोपींनी मृणाल याच्याजवळ येऊन तुला खुप माज आलाय का असे म्हणत शिवीगाळ केली.

त्यानंतर आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. एका आरोपीने त्याच्या हातातील धरदार हत्याराने मृणाल याच्या डाव्या हातावर मारुन गंभीर जखमी करुन आरोपी तेथून पळून गेले. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार अनिल भोसले करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!