Amol Kolhe : अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील समोरासमोर, कोल्हे यांच्या ‘या’ कृतीने जिंकले सर्वांचे मन, शिवनेरीवर नेमकं घडलं काय?


Amol Kolhe : पुणे जिल्ह्यातील शिरुर लाेकसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दाेनगटात अटीतटीची लढत हाेत आहे. शरदचंद्र पवार गटाकडून तुतारी चिन्हावर अभिनेते खासदार डाॅ.अमाेल काेल्हे हे निवडणूक लढवत आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घडयाळ चिन्हावर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

एकमेकांवर आराेप प्रत्यारेप करणारे सदर दोन्ही नेते समोरासमोर आले. याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती आहे. त्यामुळे अनेक शिवभक्त किल्ले शिवनेरीवर जात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतात.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील किल्ले शिवनेरीवर जात महाराजांना अभिवादन केलं. यावेळी हे दोन्ही नेते समोरासमोर आले. Amol Kolhe

यावेळी दोघांमध्ये काहीवेळासाठी बातचितही झाली. यावेळी अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांना वाकून नमस्कार केला. आज शिवरायांची जयंती आहे. त्यांना विनम्र अभिवादन करतो. त्यांच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी मी शिवनेरीवर आलो आहे, असे अमोल कोल्हे यावेळी म्हणाले आहे.

सर्वसामान्य नागरिकांसाठी लढण्याची प्रेरणा द्या…

दिल्लीच्या तख्तासमोर न झुकण्याची आणि स्वाभिमान गहाण ठेवायचा नाही. ही प्रेरणा किल्ले शिवनेरीवर मिळते. कोणत्याही मंदिरात जाण्याआधी पहिले नतमस्तक झालो. तो शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीवर, पहिला पायरीचे दर्शन घेतल्यानंतर संघर्षाची प्रेरणा स्वाभिमानाची प्रेरणा मिळते. लढण्यासाठी ताकद द्या. सर्वसामान्य नागरिकांसाठी लढण्याची प्रेरणा द्या, हेच आज शिवनेरीवर नतमस्तक होताना मागणे मागितले, असे अमोल कोल्हे म्हणाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!