Baramati Lok Sabha : शिवतारेंची तलवार अखेर मवाळ! फडणवीसांनी केली मध्यस्थी, अजित पवारांसोबतचा वाद अखेर मिटला…


Baramati Lok Sabha : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाद अखेर मिटला असून दोन्ही नेत्यांमध्ये समेट झाल्याची माहिती आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीतल्या नेत्यांमधील वाद आता जवळपास संपला आहे.

याबाबत विजय शिवतारे आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बारामती मतदारसंघ मागच्या काही दिवसापासून चांगला चर्चेत आहे. कारण या ठिकाणी पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे.

त्यामध्ये बारामती मतदारसंघातून शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी देखील अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. त्यामुळे बारामतीत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. Baramati Lok Sabha

दरम्यान, विजय शिवतारे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महायुतीतील नेत्यांचे टेन्शन वाढले होते. त्यामुळे पुन्हा एकदा बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय शिवतारे यांच्या सोबत वर्षा या शासकीय निवासस्थानी चर्चा केली.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या मन धरणीनंतर विजय शिवतारे यांनी बारामतीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.आज विजय शिवतारे पत्रकारपरिषद घेऊ आपली भूमिका मांडणार असून ते बारामतीतून अपक्ष निवडणूक लढवण्याचा आपला निर्णय मागे घेऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!