हवेली तालुक्यातील सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीत तीन पत्यांचा जुगार अड्ड्यावर उरुळी कांचन पोलिसांचा छापा; ६ हजारांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा दाखल!


उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळेजवळ जुगार अड्ड्यावर उरुळी कांचन पोलिसांनी छापा टाकला असून तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत ६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी (ता.२६) सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे.

उमेश उर्फ टक्का, सेवानिवृत्त गार्ड, (वय ४९, रा. बेतवस्ती लोणी काळभोर ता. हवेली), दिलीप शिवाजी सोनवणे, (वय ३८, रा. हवेली) विवेक माणिक काळभोर (वय – ५५, रा. कदमवाकवस्ती ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार अमोल संजय खांडेकर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळेजवळ तीन पत्यांचा जुगार सुरु असल्याची माहिती उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी त्वरित उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकास माहिती देऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

सदर ठिकाणी पोलीस पोहोचले असता त्याठिकाणी तिघेजण जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तसेच त्याच्या जवळ असलेले जुगाराचे साहित्य, भारतीय चलनातील नोटा, आढळून आल्या.

दरम्यान, ६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून अधिक तपास पोलीस हवालदार रमेश भोसले करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!