Navneet Rana : नवनीत राणा यांचेही तिकीट कापले जाणार? महत्वाची माहिती आली समोर, राणांचे टेन्शन वाढले…


Navneet Rana : लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाणे जाहीर केली आहे. याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. देशात लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत. यातील पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिलला होणार आहे तर ४ जूनला याचा निकाल लागणार आहे .

अशातच आता बोगस जातप्रमाणपत्रावरून सोलापूरचे विद्यमान खासदार सिद्धेश्वर महाराज यांना यावेळी लोकसभेचे तिकिट देण्यात आले नाही. भाजपाने त्यांचे तिकिट कापून बीडच्या राम सातपुते यांना दिले आहे.

असाच नियम भाजपा अमरावतीमध्ये नवनीत राणांना लावणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे.यावर भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार नवनीत राणा यांच्याकडेही जातीचे बोगस प्रमाणपत्र आहे. उच्च न्यायालयाने त्यांचे प्रमाणपत्र रद्द केले आहे. Navneet Rana

याविरोधात सर्वोच्च न्यायालयात निकाल प्रलंबित आहे. येत्या १ एप्रिलला यावर निकाल येण्याची शक्यता आहे. नवनीत कौर राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झालेला आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल राणांविरोधात आला तर भाजपा लोकसभा उमेदवारी देणार नसल्याची शक्यता आहे.

सोलापूरप्रमाणे अमरावतीतही भाजपा राणांना डच्चू देणार असल्याची चर्चा आहे. राणा भाजपाच्या तिकिटावरून लढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भाजपानेही अमरावतीची जागा भाजपाच्याच तिकिटावर लढविली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजप खासदार अनिल बोंडेंच्या वक्तव्याने नवनीत राणांची धाकधूक वाढली असून, राणा यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!