पतिने पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून घराला लावली आग; आगीत पत्नी आणि दोन मुलींचा होरपळून मृत्यू

अहमदनगर : पतिने पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून घराला बाहेरून कुलूप लावून घरावर पेट्रोल शिंपडून आग लावून दिल्याने या आगीत पत्नी आणि दोन मुलींचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अहमदनगर शहरा जवळच असलेल्या पिंपळगाव लांडगा येथून समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
सुनील लांडगे असे या आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी सुनील लांडगे याच्यावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर शहरा जवळच असलेल्या पिंपळगाव लांडगा येथे सुनील याने पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून घराला बाहेरून कुलूप लावून घरावर पेट्रोल शिंपडून आग लावून दिली.
त्यानंतर घराला भीषण आग लागली. या आगीत पत्नी आणि दोन मुलींना होरपळून मृत्यू झाला आहे. ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी सुनील याच्या घराकडे धाव घेतली; मात्र घराला कुलूप लावलेले असल्यामुळे त्यांना काही मदत करता आली नाही.
दरम्यान, नगर तालुका पोलिसांनी सुनील लांडगे याला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.