Loni Kalbhor : आळंदी म्हातोबाची येथे टोळक्याचा धुडघुस, घरात घुसून महिलेसह मुलांना मारहाण, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ६ जणांवर गुन्हा दाखल…


Loni Kalbhor : दिवसागणिक गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या वेगात वाढले आहेत.

सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. महिलेच्या घरात प्रवेश करून तिला आणि तिच्या मुलांना सहा जणांनी मारहाण करुन राहत्या घरातील पत्र्याचे नुकसान केल्याची घटना उघडकीस आली आहे.

ही घटना आळंदी म्हातोबाची (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पाटील नगर परिसरात सोमवारी (ता. २५) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एका ५० वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पप्पू काळे, रोहित एकनाथ वाल्हेकर, स्वप्नील केसरकर, खटाटे (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) व आणखी दोघेजण अशा सहा जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

मिळालेल्या माहिती नुसार, सोमवारी सायंकाळी फिर्यादी या घरी असताना आरोपी सहाजण अचानक घरामध्ये शिरले. यावेळी फिर्यादी यांची मुले घरात असताना आरोपींनी मुलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करत असताना त्यांच्या जवळ असलेल्या लोखंडी हत्याराने घराच्या पत्र्यावर मारून पत्रे चेपवून टाकले. Loni Kalbhor

तसेच घरावर दगड मारून पत्र्यांचे नुकसान करत लोखंडी हत्याराचा धाक दाखवून त्या ठिकाणी असलेले घर सोडून जाण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!