Ajit Pawar : अजित पवारांनी राष्ट्रवादीचा पहिला अधिकृत उमेदवार केला जाहीर, थेट नावच सांगून दिला सर्वांना मोठा धक्का…

Ajit Pawarलोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाणे जाहीर केली आहे. याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. देशात लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत. यातील पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिलला होणार आहे तर ४ जूनला याचा निकाल लागणार आहे .

याच पार्शभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी पहिला उमेदवार जाहीर केला आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा सुनील तटकरे यांना उमदेवारी देण्यात आली आहे.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक झाली. या बैठकीत तटकरेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला. त्याबाबतची माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. येत्या २८ तारखेला महायुतीचा संपूर्ण फॉर्म्युला जाहीर केला जाईल, असे अजित पवारांनी सांगितले आहे. Ajit Pawar

अजित पवार या जागांसाठी आग्रही…
महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नेमक्या किती जागा मिळणार, याबाबत नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस बारामती, शिरुर, रायगड आणि सातारा या मतदारसंघासाठी आग्रही आहे.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. आजच्या पुण्यातील बैठकीत बारामती, शिरूर, सातारा ,धाराशिव, नाशिक, रायगड परभणी लोकसभा संदर्भात चर्चा झाली. परभणीचा उमेदवार दोन दिवसात ठरणार आहे.
या बैठकीत बारामती लोकसभेची जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचच लढवणार, असल्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. आजच्या पुण्यातील बैठकीत बारामती, शिरूर, सातारा ,धाराशिव, नाशिक, रायगड परभणी लोकसभा संदर्भात चर्चा झाली.
परभणीचा उमेदवार दोन दिवसांत ठरणार असून महादेव जानकरांना पाठिंबा ही केवळ अफवा असून विरोधकानी पसरवली असल्याची माहिती सुनील तटकरेंनी दिली आहे.