Pune Crime : मुलीला अपशब्द वापरणे बेतले जीवावर, संतापलेल्या नातेवाईकाच्या मारहाणीत तरूणाचा मृत्यू, बिबेवाडीतील घटनेने उडाली खळबळ….


Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

नातवाईकाच्या मुलीला अपशब्द वापरल्यामुळे संतापून तरूणाला मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत गंभीर जखमी होवून तरूणाचा मृत्यू झाला आहे. पुण्यात बिबवेवाडीत तरुणाचा खून झाला आहे.

ही घटना काल सकाळी (ता.२५) रोजी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नातेवाइकाच्या मुलीबाबत अपशब्द वापरल्याच्या कारणावरून या तरुणाची हत्या झाली आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बसवराज चिदानंद गजंत्रे (वय २६, रा. आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, नातेवाइकाच्या मुलीबाब तअपशब्द वापरले. त्यामुळे संतापून संबंधित नातेवाईकाने मृत तरूणाल बसवराज याच्या डोक्यात लोखंडी पाइप आणि दगडाने मारहाण केली. Pune Crime

या मारहाणीमध्ये बसवराज गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अधिक तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत. या घटनेने पुन्हा एकदा पुणे हादरले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!