Nokia 3210 : आता Nokia पुन्हा मार्केट गाजवणार! नवीन फोनची धमाकेदार होणार एन्ट्री, 108MP च्या कॅमेऱ्याची होतेय चर्चा..


Nokia 3210 : भारतीय बाजारात काही वर्षांपूर्वी Nokia 3210 चा जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत होता. बाजारात या फोनची जबरदस्त मागणी देखील होती मात्र आता या फोनची क्रेझ कमी झाली आहे. अशातच आता कंपनीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे

कारण या फोनची बाजारात पुन्हा एकदा दमदार एंट्री होणार आहे. याबाबत या कंपनीचे स्मार्टफोन बनवणाऱ्या HMD ग्लोबल कंपनीने माहिती दिली असून या फोनमध्ये 108MP कॅमेरा दिला जाऊ शकतो. HMD ग्लोबल कंपनीने सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.

सोशल मीडियावर दिली माहिती…

आज माझा वाढदिवस असून एक आयकॉन लवकरच परत येणार आहे, अशा आशयाची पोस्ट HMD ग्लोबल कंपनीने 18 मार्च रोजी केली होती. यासोबतच नोकिया फोन्स असा हॅशटॅग देखील HMD ग्लोबल कंपनीने वापरला आहे. असे असले तरी ही पोस्ट कोणत्या मॉडेलबद्दल असेल, याची कोणतीही माहिती स्पष्टपणे कंपनीकडून देण्यात आली नाही. Nokia 3210

१८ मार्च १९९९ रोजी बाजारात Nokia चा 3210 हा स्मार्टफोन लाँच केला होता. त्यामुळे आता हाच फोन नवीन स्वरुपात भारतात पुन्हा लाँच होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहेत.

या फोनचं नाव 3210 असेल की दुसरं काही याबाबत कोणीतही माहिती समोर आली नाही. विशेष म्हणजे या फोनमध्ये तब्बल 108MP कॅमेरा दिला जाईल. अशी माहिती समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!