Salary Package : पुणे, मुंबई सोडा! आता राज्यातील या शहरात देशातील सर्वाधिक पॅकेज, जाणून घ्या….


Salary Package : आपल्याकडे समज असतो की मुंबई, पुणे, बंगळूर, हैदराबाद किंवा नवी दिल्ली या शहरात मोठा पगार मिळतो. याठिकाणी नोकरी करण्याचे उच्च शिक्षित तरुणांचे स्वप्न असते. कारण या शहरांमध्ये चांगल्या कंपन्या आहेत. तसेच या शहरांमध्ये पगार सर्वाधिक मिळतो.

असे असताना हा अंदाज चुकणारा आहे. देशात सर्वाधिक पगार देशातील या टिअर १ शहरात नाही तर महाराष्ट्रातील टिअर २ शहरात मिळत आहे. महाराष्ट्रातील सोलापूर शहराने मुंबई, पुणे, बंगळूर, हैदराबाद आणि नवी दिल्ली या बड्या शहरांना पगाराच्या बाबतीत मागे टाकले आहे.

यामुळे सध्या याचीच चर्चा सुरू आहे. देशात सर्वाधिक पगार मिळणारे शहर म्हणून सोलापूरची ओळख झाली आहे. सोलापूर तस दुष्काळी शहर आहे. मात्र याठिकाणी मोठ्या कंपन्या आहेत. महाराष्ट्रातील सोलापूर हे शहर आणि जिल्हा टॉवेल, चादरी निर्माण करणार आहे. या शहरातील चादरी देशभर प्रसिद्ध आहे. Salary Package

परंतु काळाप्रमाणे शहरात बदल होऊ लगाले आहे. इतर उद्योग शहरात आले आहेत. आता देशातील सर्वाधिक सरासरी पगार देणारे शहर म्हणून सोलापूर पुढे आले आहे. हा सकारात्मक बदल आश्चर्यकारक आहे. यामुळे याठिकाणी आता तरुणांची पावलं येतील.

एका सर्वेनुसार यामध्ये आता सोलापूर शहराने दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळूर आणि हैदराबादसारख्या टिअर १ शहरांना मागे सोडले आहे. सोलापूरमध्ये वर्षाचा सरासरी पगार २८,१०,००० रुपये आहे. सोलापूरनंतर दुसऱ्या क्रमांकावर मुंबई आहे.

मुंबईत सरासरी वार्षिक पगार २१.१७ लाख रुपये आहे. बंगळूरमध्ये सरासरी वार्षिक पगाराची रेंज २१.०१ लाख रुपये आहे. दिल्लीत २०.४३ लाख रुपये वार्षिक पगार मिळतो. यामुळे यामध्ये सोलापूरने डंका वाजवला आहे. ही बाब नक्कीच राज्यासाठी महत्वाची आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!