Crime : फेशियल करण्यासाठी घरी बोलावून, ३१ वर्षीय महिलेवर बलात्कार

नागपूर : फेशियल करण्यासाठी घरी बोलावून मालकाने ३१ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नागपुरातील प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतुन समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी पीयूष ढावले (वय ३३, मूळ रा.सुठाणा, जि.चंद्रपूर) याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पीयूषच्या प्रतिष्ठानात काम करते. तिला मेकअपचे काम येते. त्याने महिलेने फेशियल करण्यासाठी घरी बोलाविले. तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तो तिचे शारीरिक शोषण करायला लागला. काही दिवसांपूर्वी त्याने लग्नास नकार दिला.

दरम्यान, बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
Views:
[jp_post_view]