Govinda : अभिनेता गोविंदा राजकारणाच्या मैदानात, महाराष्ट्रातील ‘या’ मतदार संघात लढवणार लोकसभा निवडणुक, जाणून घ्या…

Govinda : अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा राजकारणात एन्ट्री करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यंदा गोविंदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी गोविदांचे नाव चर्चेत आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून गोविंदा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे. त्यासाठी लवकरच गोविंदा शिंदेच्या शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश…
उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाच्या रेसमध्ये आणखी एका अभिनेत्याचं नाव चर्चेत आहे. अभिनेता गोविंदा आहुजा यांचे नाव सध्या उत्तर पश्चिम मुंबईसाठी चर्चेत आहे. लवकरच गोविंदा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी या अनुशंगाने अभिनेता गोविंदाने मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उत्तर पश्चिम मतदार संघातून महाविकास आघाडीकडून अमोल किर्तीकर यांच्या नावाची घोषणा ठाकरेंनी केली आहे. गजानन किर्तीकर यांचे वय लक्षात घेता, त्यांच्या जागी चर्चेतला आणि अनुभवी उमेदवार असायला हवा, या अनुशंगाने अभिनेता गोविंदाच्या नावाची चर्चा आहे
