Crime News : मोबाईल चोरल्याच्या संशय अन् एकाला बेदम मारहाण करुन खून, पिंपरी चिंचवडमध्ये धक्कादायक घटना..


Crime News : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन एका व्यक्तीला लाकडी बांबू व फळीने बेदम मारहाण करुन ठार मारल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार चिखली येथील प्रल्हाद सोनवणे यांच्या मालकीच्या मोकळ्या जागेतील पत्र्याच्या शेड जवळ बुधवारी (ता.२०) सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.

महादेव विठ्ठल शिंदे (वय.४५ रा. रामदासनगर, मोरे पाटील चाळ, चिखली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकणी पोलीस उपनिरीक्षक विजय जनार्दन पंचमुख (वय.३४) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार राजु अनिल गांगुली (वय.२८ रा. कुदळवाडी, चिखली), विनोद शांताराम पवार (वय.२२ रा. कुदळवाडी चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी राजू गांगुली याच्या ओळखीच्या महिलेचा मोबाईल मयत महादेव शिंदे यांनी चोरी केल्याचा संशय होता. बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महादेव चिखली येथील चौधरी वजन काट्या जवळ आला. त्यावेळी राजू याच्या ओळखीची महिला महादेव याच्याकडे मोबाईल बाबत चौकशी करत होती. त्यावेळी आरोपी राजू व विनोद त्या ठिकाणी आले. Crime News

मोबाईल चोरल्याच्या कारणावरुन त्यांनी महादेव याच्यासोबत वाद घालून हाताने मारहाण केली. राजूने त्याठिकाणी पडलेल्या लाकडी बांबूने महादेव यांच्या डोक्यात मारहाण करुन गंभीर जखमी केले. तर विनोद याने लाकडी फळीने मारहाण केली. यात गंभीर जखमी होऊन महादेव शिंदे यांचा मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुळीक करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!