Pune Crime : बिबवेवाडीत प्रेमप्रकरणातून बारामतीतील तरुणाचा खून! विवाहित तरुणीला भेटायला गेल्यावर घडली धक्कादायक घटना, पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल…


Pune Crime : दिवसागणिक गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे घटनेत वाढ होताना दिसत आहे.

प्रेमसंबंधातून बारामतीतील तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली आहे. याप्रकरणी तरुणीच्या पतीसह अल्पवयीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

संग्राम हनुमंत साळुंके (वय २२, रा. वडकेनगर, बारामती, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नितीन रेणुसे, आदित्य गवळी, अनिकेत चव्हाण यांच्यासह दोन अल्पवयीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, धनकवडीतील आंबेगाव पठार परिसरात राहणाऱ्या एका विवाहित तरुणीची संग्राम याच्याशी ओळख झाली होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. तरुणीच्या पतीला याबाबतची माहिती मिळाली होती. संग्राम तरुणीला भेटण्यासाठी पुण्यात येणार असल्याची माहिती तरुणीचा पती नितीन रेणुसेला मिळाली होती. Pune Crime

तो बिबवेवाडीतील किया सर्व्हीस सेंटरजवळ २ डिसेंबर २०२३ रोजी आला होता. आरोपी रेणुसे, गवळी, चव्हाण आणि दोन अल्पवयीन साथीदार यांनी पाळत ठेवली हाेती. त्यांनी संग्रामला गाठले. त्याला दुचाकीवर बसवून अप्पर इंदिरानगर परिसरात गॅस गोदामाजवळ नेले.

तेथे त्याला बेदम मारहाण केली. मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. त्याला तेथेच सोडून आरोपी पसार झाले. संग्रामला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

संग्रामच्या खुनामागचे कारण पोलिसांना समजू शकले नव्हते. पोलिसांनी सुरुवातीला याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. वैद्यकीय अहवालात त्याचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे उघड झाले. तपासात संग्रामवर एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात येणार होती.

शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचे चौकशीत उघड झाले. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक निकुंभ तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!