Loksabha Election 2024 : पुणे लोकसभेला धंगेकरच!! काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर, आता होणार जोरदार लढत…


Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाणे जाहीर केली आहे. याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. देशात लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत.

यातील पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिलला होणार आहे तर ४ जूनला याचा निकाल लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमदवाराची यादी जाहीर केली आहे.

काँग्रेसने महाराष्ट्रातील सात उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये पुण्यातून काँग्रेसने आमदार रवींद्र धंगेकर यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. Loksabha Election 2024

आज काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारीची घोषणा करण्यात आली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी केली. यावेळी त्यांनी पक्षासाठी आणि पुण्यातील जनतेसाठी काम करणार असल्याचे सांगितले आहे.

भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ..

पुण्यात भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे आता पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यात थेट सामना होणार आहे. पुणेकर कुणाला पसंती देणार, हे चार जून रोजी स्पष्ट होईल.

पुणे लोकसभेसाठी भाजप आणि काँग्रेस यांच्याकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना मैदानात उतरवण्यात आले आहे.

तर काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात आता मोहोळ विरुद्ध धंगेकर असा थेट सामना होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!