Pune Crime News : क्रिकेट खेळताना झाला वाद, अन् थेट गोळीबाराचा आवाज, पुण्यात घडली थरारक घटना, नेमकं घडलं काय?


Pune Crime News : क्रिकेटवरून झालेल्या वादातून पुण्यात गोळीबार करण्यात आल्याची घघटना समोर येत आहे. पुण्यातील कात्रज भागात हा सर्व प्रकार घडला असून, सुदैवानं गोळीबारात कोणी जखमी नाही.

या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबार होताच परिसरात पळापळ झाली आणि यावेळी दोन तरुण जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, कात्रज भागात राहत असलेल्या दोन गटात क्रिकेटचा सामना मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, मॅच सुरु असतानाच क्रिकेट खेळण्यावरून वाद झाला होता. हाच वाद मिटवण्यासाठी दोन्ही गटातील तरुण पुन्हा बुधवारी भेटले.

यावेळी एका गटात एक रेकॉर्ड वरचा गुन्हेगार होता. तर, वाद मिटवण्यासाठी आलेल्या तरुणांमध्ये पुन्हा वाद झाले. दरम्यान, यावेळी एका तरुणाने समोरच्या गटात असणाऱ्या तरुणावर बंदूक ताणली आणि गोळी चालवली. Pune Crime News

मात्र, ती गोळी त्याला लागली नाही. गोळीबार होताच परिसरात पळापळ झाली आणि यावेळी दोन तरुण जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहराजवळ झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच आता पुण्यात आणखी एक गोळीबाराची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!