Madhya Pradesh : खळबळजनक! पैशांसाठी मुलीने वडिलांकडेच रचला अपहरणाचा कट, मागितले ३० लाख, ‘असा’ उघड झाला तिचा प्लॅन…


Madhya Pradesh : एका विद्यार्थिनीने पैशांसाठी आपल्या वडिलांना फसवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खरं तर तिने तिच्या मित्रांसह अपहरणाचा कट रचला. येथील तरूणीचा अज्ञातांनी फोटो तिच्या कुटुंबीयांना पाठवला अन् पैशांची मागणी केली. पण याप्रकरणी आता मोठा खुलासा झाला असून एक वेगळीच माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, १८ मार्च रोजी बैराड येथील शाळा संचालक शिवपुरी यांना मुलगी काव्या धाकड हिच्या अपहरणाची छायाचित्रे व्हॉट्सॲपवर प्राप्त झाली, ज्यामध्ये काव्या धाकडचे हातपाय दोरीने बांधलेले असून अपहरणकर्त्याने ३० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. तिने तिच्या मित्रांसह अपहरणाचा कट रचला असल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी तरूणीच्या वडिलांनी कोटा येथील विज्ञान नगर पोलीस ठाण्यात आपल्या मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. आपल्या मुलीचे अपहरण झाल्याचे विद्यार्थिनीच्या वडिलांनी सांगितले. त्यांच्या व्हॉट्सॲपवर अपहरणाचा मेसेज आला होता, ज्यामध्ये अपहरणकर्त्यांनी ३० लाख रुपयांची मागणी केली होती. Madhya Pradesh

अपहरण केलेल्या तरुणीचा काही अज्ञातांनी फोटो तिच्या कुटुंबीयांना पाठवला आणि पैशांची मागणी केली. संबंधित तरूणी राजस्थानातील कोटा येथे राहून NEET ची तयारी करते. अपहरणाची घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणाचे गूढ उकलण्यास सुरुवात केली आहे.

तपासात गुंतलेल्या पोलिसांनी एकामागून एक अनेक खुलासे केले आणि काव्याचे अपहरण झाले नसून सर्व गोष्टी खोट्या असल्याचे निष्पन्न झाले. विद्यार्थिनीचे अपहरण झाले नव्हते किंवा ती कोटा येथे राहत नव्हती

.काव्याने तिच्या दोन मैत्रिणींसोबत मिळून अपहरणाची बनावट स्क्रिप्ट तयार केली होती कारण तिला आणि तिच्या एका मैत्रिणीला परदेशात शिक्षण घ्यायचे होते आणि त्यासाठी पैशांची गरज होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!