Pune Crime : सावत्र बापाकडून मुलीसोबत अश्लील चाळे, लोणीकंद पोलिसांनी बापाला केली अटक…


Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

सावत्र बापाने १९ वर्षीय मुलीशी अश्‍लील चाळे करून विनयभंग केला. बापलेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी ही घटना हवेली तालुक्यातील बकोरी गावात घडली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी सावत्र बापाला अटक केली आहे. हा प्रकार जुलै २०२३ ते १७ मार्च २०२४ या कालावधीत पिडितेच्या घरात घडला आहे. Pune Crime

याबाबत १९ वर्षीय पीडित मुलीने मंगळवारी (ता.१९) लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार येरवडा परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय सावत्र बापावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे

मिळालेल्या माहिती नुसार, पीडित मुलीच्या आईने आरोपीसोबत दुसरे लग्न केले आहे. लग्नानंतर आरोपीची वाईट नजर पीडित मुलीवर पडली. सापत्र बापाने मुलीला अश्लील बोलून शारीरिक सुखाची मागणी केली. तसेच तिच्यासोबत अश्लील चाळे करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

याबाबत आईला सांगितले तर तुला व तुझ्या आईला मारुन टाकण्याची धमकी आरोपीने दिली. दरम्यान फिर्यादी तरुणीचे लग्न जमले. यावरुन आरोपीने फिर्यादी च्या आईला लग्न कोणी ठरवले असे बोलून शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!