Tiger Shroff : टायगर श्रॉफ झाला पुणेकर!! घेतले कोट्यवधींचे घर, महिन्याला लाखो रुपयांचे भाडे, नेमकं कुठं घेतलं घर? जाणून घ्या…


Tiger Shroff  : बॉलीवूड कलाकार टायगर श्रॉफ याने मुंबईनंतर पुण्यात विकत घर घेतले असून आता तो पुणेकर झाला आहे पुणे शहरातील हडपसर भागात त्याने ७.५ कोटी रुपयांमध्ये ४,२४८ वर्गफूट घर घेतले आहे. पंचशील रिअल्टीने विकसित केलेल्या प्रकल्पात टायगर श्रॉफ याने जागा घेतली आहे.

रियल एस्टेट डेटाबेस प्लेटफॉर्म जैपकी कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या मालमत्तेसाठी टायगर श्रॉफ याने ५२.५ लाख रुपयांची स्टँप ड्यूटी भरली आहे. ५ मार्च २०२४ रोजी हे घर टायगर श्रॉफ याने घेतले. पुणे शहरातील चांगले वातावरणामुळे अनेकांनी गुंतणुकीसाठी पुण्याला प्राधान्य दिले आहे. Tiger Shroff

टायगर श्रॉफ याने घर घेताच ते भाड्याने दिले आहे. या घराचे भाडे महिन्याला ३.५ लाख रुपये आहे. या घरासाठी १४ लाख रुपये डिपॉजिट घेतले आहे. यासाठी पाच वर्षांचा करार केला आहे. दरवर्षी भाड्यात पाच टक्के वाढ होणार आहे. चेराइज इंडिया प्राइव्हेट लिमिटेडने ही प्रापर्टी भाड्याने घेतली आहे. ही कंपनी शीतपेयाच्या व्यवसायात आहे.

मुंबईत आठ ८ बीएचके अपार्टमेंट..

टायगर श्रॉफ याचे मुंबईतील खारमध्ये ८ बीएचके अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटची किंमत जवळपास ३५ कोटी रुपये आहे. २००३ मध्ये टायगर श्रॉफचे आई-वडील जॅकी श्रॉफ आणि आयशा श्रॉफ यांना ‘बूम’ चित्रपटाच्या अपयशानंतर घर विकावे लागले होते. या चित्रपटाची निर्मिती जॅकी श्रॉफ याने केली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!