Ajit Pawar : अखेर ठरलं! शिरूर मधून आढळराव पाटीलच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, अजित पवार यांनी केली घोषणा…


Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीची महायुतीकडून तयारी सुरु आहे. जागा वाटपचा विषय आता अंतिम टप्प्यात आहे. . शिरूर लोकसभेच्या जागेवरून महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये संघर्ष सुरू होता. अखेर आज नावाची घोषणा करण्यात आली आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी शिवाजीराव आढळराव पाटील यांना देण्याचे ठरले आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राजगुरूनगर येथील पक्ष मेळाव्यात केली आहे.

शिवसेनेच्या वरिष्ठांच्या संमतीने आढळरावांना पक्षात घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करण्यात येत आहे.या जागेसाठी दिलीप वळसे पाटील, नाना पाटेकर, प्रदीप कंद, विलास लांडे या सगळ्यांच्या बाबतीत विचार झाला. Ajit Pawar

आढळराव पाटील यांचे ठरले आहे. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. आपल्या विचारांचा आणि केंद्रात सत्ता असलेल्या प्रतिनिधींचा फायदा विकास कामे करायला होतो. हलक्या कानाचे होऊ नका. आढळराव पाटील यांच्याशी चर्चा करून आता पक्षात घेण्याचे व उमेदवारी देण्याचे ठरले आहे. असेही अजित पवार म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!