Pune Crime : हॉस्टेल कर्मचाऱ्याकडून छेडछाड अन् रुममेटकडूनही त्रास, पुण्याच्या प्रसिद्ध कॉलेजच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल…


Pune Crime : हॉस्टेल कर्मचाऱ्याकडून छेडछाड आणि रूममेटही त्रास देत असल्यामुळे कंटाळून एका विद्यार्थिनीने स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. पुण्यातील कात्रज परिसरात हा अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे.

पुण्यातील प्रसिद्ध कॉलेजच्या हॉस्टेलमध्येच या विद्यार्थिनीने स्वतःला पेटवून घेत आयुष्य संपवलं. तिच्यावर अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते, मात्र तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि तिने अखेरचा श्वास घेतला.

रेणुका बालाजी साळुंखे (वय.१९) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनींचे नाव आहे. या विद्यार्थिनीच्या कथित आत्महत्येप्रकरणी वसतीगृहाच्या उपहारगृहात काम करणारा कर्मचारी सतीश जाधव आणि वसतीगृहातचराहणारी मुस्कान महेंद्रसिंग सिद्धू (वय. ९) या विद्यार्थिनीविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाजी धोंडीबा साळुंखे यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, दाखल तक्रारीनुसार मृत विद्यार्थिनी ही बालाजी साळुंखे यांची मुलगी आहे. ती भारतीय विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहत होती. याच वसतीगृहात काम करणारा सतिश जाधव नावाचा कर्मचारी रेणुकाला ‘आय लव्ह यू’ म्हणजेच माझे तुझ्यावर प्रेम आहे, अशा प्रकारचे मेसेज सतत पाठवायचा. Pune Crime

मृत विद्यार्थिनी समोर दिसताच ‘तू इतकी बिझी झालीस का? मी किती मेसेज केले,’ असे म्हणत सतिश तिला त्रास द्यायचा. या प्रकारामुळे रेणूका घाबरली होती. यासह तिच्या खोलीत राहणारी मुस्कान सिद्धू नावाची मुलगीही तिला अभ्यास करू देत नव्हती. ती सतत खोलीचे लाईट्स बंद करायची.

दरम्यान, या दोघांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून रेणुकाने अखेर वसतीगृहातील स्वच्छतागृहात ७ मार्चच्या रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास स्वतःला पेटवून घेतले होते. पुण्यातीलच सूर्या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार चालू होते. उपचार चालू असतानाच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास चालू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!