सोलापूर हादरले! आईने पोटच्या मुलाचे केले कुऱ्हाडीने दोन तुकडे, घटनेने सगळेच झाले सुन्न, आईचाही आत्महत्येचा प्रयत्न…

सोलापूर : आईने स्वतःच्या पोटच्या सहा वर्षांच्या मुलाचे कु-हाडीने छाटून दोन तुकडे करून त्याचा निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना माढा तालुक्यातील कव्हे गावातुन समोर आली आहे. या घटनेने सोलापूर जिल्हा हादरले आहे.

प्रणव गणेश चोपडे असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी सासरे नारायण जगन्नाथ चोपडे (वय. ५७) यांनी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार,कौशल्या हिच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी फिर्यादी नारायण व त्यांच्या पत्नी पार्वती दोघे दुचाकीवर बसून मौजे पाच पिंपळे येथे नातेवाइकाच्या लग्नासाठी गेले होते. दुपारी १२.२० वाजेच्या सुमारास त्यांची सून कौशल्या ऊर्फ कोमल हिचा त्यांना फोन आला व रडत तिने मुलगा प्रणवचा खून केल्याची अविश्वसनीय माहिती दिली.
तेव्हा धक्का बसलेल्या नारायण चोपडे यांनी कौशल्याचा भाऊ नवनाथ जगताप आणि आपला मुलगा गणेश यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली आणि त्या दोघांना तात्काळ घरी जाण्यास सांगितले गणेश हा घरी धावून आला असता घरातील भयानक दृश्य पाहून तो पार कोसळला.
पत्नी कौशल्या कु-हाडीने मारून दोन तुकडे केल्याचे भीषण चित्र त्याला पाहायला मिळाले. स्वःताच्या मुलाचा खून केल्या नंतर तणनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असता, त्याची आई कौशल्या ऊर्फ कोमल हिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
