Pune Crime : अल्पवयीन मुलीसोबत लगट करुन गैरवर्तन, पुण्यात संतापजनक प्रकार, गुन्हा दाखल…


Pune Crime पुणे : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

मैत्रिणीसोबत गप्पा मारत थांबलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत लगट करुन तिच्यासोबत गैरवर्तन करुन विनयभंग केला. भररस्त्यात मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी वानवडी पोलिसांनी एका अल्पयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकणी पीडित मुलीच्या ४३ वर्षीय वडिलांनी सोमवारी (ता.२६) वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी १५ वर्षीय अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रविवारी (ता.२५) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास रामटेकडी येथील वाल्मिकी वस्ती येथे घडला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांची १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी वाल्मिकी वस्ती येथील सार्वजनिक रोडवर थांबलेल्या रिक्षामध्ये मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसली होती. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आला. Pune Crime

दरम्यान, त्याने मुलीचा हात पकडून तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न करुन गैरवर्तन करुन विनयभंग केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय आदलिंग करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!