Ketki Chitle : मनोज जरांगे देवेंद्र फडणवीस वादात आता केतकी चितळेची उडी, म्हणाली, एका मोर्चा धारक…

Ketki Chitle : आपल्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री केतकी चितळे हीनं पुन्हा एकदा वादग्रस्त पोस्ट केली आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे नुकतीच फडणवीसांवर केलेल्या विधानावरुन तिनं भाष्य केले आहे.

कालचा दिवस फार इंटरेस्टिंग होता. एके ठिकाणी (बरीच वर्षे शिव्या घातल्यावर) ब्राह्मण तुष्टीकरण करताना स्वतःचा कानांनी ऐकले व डोळ्यांनी बघितले, आणि दुसरीकडे, काही किलोमीटर अंतरावर एका मोर्चा धारक “महापुरुषांनी” एका राजकारणी नेत्यांना ब्राह्मण म्हणून अपशब्द वापरले, अशी बातमी ऐकली! जय महाराष्ट्र असे म्हणून गप्प बसावे का या सर्कशीत असलेल्या कलाकारांवर हातातील पॉपकॉर्न फेकावे कळत नाहीये.

अभिनेत्री केतकी चितळे हिने तिच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. अनेकांनी या पोस्टवर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. Ketki Chitle

दरम्यान, मनोज जरांगे यांनी काल आंतरवली सराटीत उपोषणादरम्यान अचानक आक्रमक झाले आणि त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर षडयंत्र करत असल्याची टीका केली. फडणवीसांवर टीका करताना त्यांनी त्याच्या ब्राह्मण असण्यावरही भाष्य केलं. त्यामुळे हे प्रकरण आता मराठा विरुद्ध ब्राह्मण अशा दिशेनं जातंय की काय असं वाटू लागले होते.