Pune Crime : पुण्यात गुन्हेगारीचा कळस! आधी अल्पवयीन मुलाचे अपहरण, नंतर अनैसर्गिक अत्याचार करुन हत्या….


Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

सध्या अशीच एक धक्कादायक घटना पुण्यातील पिंपरी चिंचवडमधून समोर आली आहे. आधी अल्पवयीन मुलाचे अपहरण केले त्यानंतर त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले आणि मग नंतर त्याची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही सर्व घटना न घडल्याचा बनाव रचला गेला. मात्र, पोलिसांच्या तपासात त्याचे बिंग फुटले आहे.

पवन पांडे असे नराधम आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार, पिंपरी चिंचवड परिसरातील वाकड हद्दीतून आरोपी नराधम पांडे हा त्या परिसरात असणाऱ्या रसवंती गृहावर कामाला आला होता. या रसवाती गृहाशोजारी एक आठ वर्षांचा मुलगा खेळत असे. त्याचे खेळणे पाहून या नराधमाने त्याला उसाचा रस प्यायला देऊन त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मग संधी साधून या नराधमाने शनिवारी रात्री आठे ते साडेआठच्या सुमारास या आठ वर्षीय मुलाचे अपहरण केले. Pune Crime

अपहरण केल्यानंतर त्या मुलाला तो नराधम पाषाण तलावाजवळ घेऊन गेला. रात्रीच्या अंधारात त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. त्यानंतर गळा दाबून त्याची तिथेच हत्या केली. आपला मुलगा कुठे गेला यावरून त्याच्या कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली. मात्र, तो न सापडल्याने कुटुंबीयांनी अखेर पोलिसांत तक्रार दिली.

दुसरीकडे रात्री साधारण अकराच्या सुमारास रसवंती गृहाच्या मालकाने पांडेला फोन करून विचारले की, मुलाला पाहिले का? त्यावर तो आपल्याला याबाबत काहीच माहीत नसल्याचे म्हणाला. त्यानंतर पोलिसांनी आपल्या तापसाची चक्रे फिरवत परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली. त्यात एका सीसीटीव्हीत रसवंती गृहावर काम करणारा पांडे हा मुलाला खुणावत असल्याचे पाहायला मिळाले आणि काही अंतर गेल्यावर दोघेही गायब झाल्याचे दिसले.

वाकड पोलिसांना पांडे याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी पाषाण गाठले आणि राहत्या घरातून पांडेला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला विचारणा केली मात्र त्याने काहीही सांगितले नाही. अखेर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने आपले तोंड उघडले. माझ्याकडून नको ती गोष्ट घडली. त्यात त्या मुलाचा मृत्यू झाला.

दरम्यान, याबाबत त्याच्या कुटुंबीयांना कसं उत्तर देऊ म्हणून मी त्या मुलाचा मृतदेह पाषाण परिसरात फेकल्याची कबुली त्याने दिली. मग पोलिसांनी त्याने मृतदेह फेकल्याची ठिकाण गाठले. पांडेने सर्व अपघाताचा बनाव केल्याचे समोर आले. त्याने मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याचा खून केल्याचे समोर आले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!