Pune Crime : पुणे हादरले! पत्नीची दगडाने ठेचून हत्या, नंतर पतीने घेतला गळफास, घटनेने उडाली खळबळ..


Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पतीनं असं पाऊल का उचललं, हे अद्याप समजू शकलेलं नाही.

सोमनाथ सखाराम वाघ आणि पत्नी सुवर्णा सोमनाथ वाघ अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार, दोघे पती- पत्नी रविवारी दुचाकीवरून घरातून बाहेर पडले होते. उत्तमनगरमार्गे एनडीएच्या पाठीमागील पिकॉक- बे परिसरात आले. त्या ठिकाणी त्यांनी रस्त्यालगत दुचाकी उभी केली.

ते दोघे रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या जंगलात गेले. त्या ठिकाणी पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घातला. तिची हत्या केली. त्यानंतर पतीने स्वतःच्या ट्रॅक पॅंटने झाडाला गळफास घेतला. दरम्यान, सकाळी ११ वाजून गेले तरी ते घरी परत आले नाहीत. हे पती पत्नी दुसऱ्या दिवशीही घरी परतले नाही. Pune Crime

त्यामुळे कुटुंबीयांना काळजी वाटु लागली. त्यामुळे त्यांची मुलगी व पुतण्याने त्यांचा शोध घेतला. सायंकाळी त्यांची दुचाकी पिकॉक बे परिसरात दिसली. त्या परिसरात शोध घेतला असता मुलीला आईचा मृतदेह आढळला. तर वडिलांनी झाडाला गळफास घेतल्याचं दिसून आलं. या घटनेची माहिती त्यांनी उत्तमनगर पोलिसांना दिली.

पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत कुंवर, पोलीस निरीक्षक युसूफ शेख तसंच सहाय्यक पोलीस निरीक्षक अमृता चौरे, सहाय्यक फौजदार प्रसाद जोशी, कर्मचारी धनंजय बिटले‌ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपास करण्यास सुरूवात केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!