Pune News : दारूसाठी भावच जीवावर उठला! दारूसाठी पैसे देण्यास नकार, लहान भावाकडून मोठ्या भावाला रॉडने मारहाण, पिंपरीतील धक्कादायक घटना..

Pune News : दारु पिण्यास हजार रुपये देण्यास नकार दिल्याने लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवार (ता.२२ ) सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील आळंदी येथील फुलाच्या दुकानावर घडली आहे.
याप्रकरणी महेश विष्णु देवकाते (वय.३३ रा. हनुमानवाडी, केळगाव, ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी महादेव विष्णू देवकाते (वय.२६ रा. मौजे चऱ्होली खुर्द, ता. खेड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळलेल्या माहिती नुसार, फिर्यादी महेश देवकाते हे आळंदी गावच्या हद्दीतील संदिप कायस्थ यांच्या फुलांच्या दुकानावर काम करीत होते. गुरुवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांचा लहान भाऊ महादेव हा दुकानात आला. त्याने फिर्यादी यांच्याकडे दारु पिण्यासाठी एक हजार रुपये मागितले. Pune News
मात्र, महेश याने पैसे देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने त्याच्या जवळील लोखंडी रॉड महेश याच्या डोक्यात मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच आळंदी माऊली मंदिर परिसरातील सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करुन लोकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक साळी करीत आहेत.