Accident News : पुण्यात भीषण विचित्र अपघात! आठ ते नऊ वाहनांची झाली धडक, नवले पुलाजवळील घटना…

Accident News : राज्यात अलीकडे अपघातांच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. पुण्यातील नवले पुलाजवळ एक विचित्र अपघात झाला आहे. ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पाठीमागून वाहनांना धडक दिल्याने विचित्र अपघात घडला आहे.

या विचित्र अपघातात आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली असून काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. तरी यातील वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात आज (शनिवारी) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहिती नुसार, ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पाठीमागून वाहनांना धडक दिल्याने अपघात घडला आहे. या अपघातात आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली. या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. Accident News

या अपघातामधील सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. कात्रजकडून (देहू रस्ता) नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवले पुलाच्या सिग्नलच्या अगोदर हा विचित्र अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे अंमलदार व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या. पाेलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. तसेच जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. सध्या महामार्गावरील वाहतुक धिम्या गतीने सुरु आहे.