Kisanrao Bhujbal : दबंग गटशिक्षणाधिकारी काळाच्या पडद्याआड! पुण्यातील किसनराव भुजबळ यांचे दुःखद निधन…


Kisanrao Bhujbal : पुणे जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात गटशिक्षणाधिकारी म्हणून काम करणारे एक निर्भिड, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून जिल्ह्यात दबदबा असणारे किसन दत्तोबा भुजबळ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

त्यांच्या निधनाने शिक्षण विभागात शोककळा पसरली आहे. भुजबळ यांची बायपास शस्त्रक्रिया झाली होती. शुक्रवारी रात्री अचानक त्रास होऊ लागल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले

पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे तालुक्यातील कासारी येथील मुळ गावचे रहिवासी असलेले आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. किसन भुजबळ यांनी पुणे, हवेली, भोर, जुन्नर, दौंड तालुक्यात गटशिक्षणाधिकारी म्हणून काम केले. Kisanrao Bhujbal

सध्या ते मुळशी तालुक्यात गटशिक्षणाधिकारी म्हणून काम पाहत होते. दौंड तालुक्यात गटशिक्षणाधिकारी अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी बेकायदा आणि बोगस शाळांवर धडक कारवाई करत त्या सिल करून कारवाई केली होती. ही कारवाई रोखण्यासाठी त्यांच्यावर प्रचंड राजकीय दबाव आणला गेला होता. मात्र त्यांनी तालुक्यातील बोगस शाळांवर कारवाई बडगा चालूच ठेवल्याने त्यांची बदली करण्यात आली होती.

त्यांच्या या बदलीचा अनेक सामाजिक संघटना आणि पालकांनी निषेध केला होता. तर दौंड तालुक्यातील केडगाव येथील एका शाळेत दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपी प्रकरणी संस्था चालक व शिक्षकांच्यावर गुन्हे दाखल करून ठोस कारवाई केली होती.

त्यांच्या या निर्भिड आणि डॅशिंग कामकाजामुळे शिक्षण विभागात मोठा दबदबा होता. मात्र शुक्रवारी त्याच्या निधनाची बातमी मुळे शिक्षण विभागातच नव्हे, तर पुणे जिल्ह्यातील त्यांच्या मित्र परिवार, नातेवाईक यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!