Pune Crime : धक्कादायक! मारहाण करुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चंदननगर परिसरातील घटनेने खळबळ..

Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

अल्पवयीन मुलीला मारहाण करुन वारंवार तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर गर्भपात करण्यासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एका तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत खराडी, वाघोली येथे घडला आहे.

याप्रकणी १७ वर्षीय पीडित मुलीने गुरुवारी (ता.२२) चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मयुर संजय केंद्रे (वय.२४ रा. खांदवेनगर, लोहगाव पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Crime

मिळालेल्या माहिती नुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने पीडित मुलीला वाघोली आणि खराडी येथे बोलावून घेतले. पीडित मुलगी त्याठिकाणी आली असता तिला एका महिलेच्या घरी घेऊन गेला. त्याठिकाणी तिला शिवागाळ करुन मारहाण केली.
तसेच मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिच्यासोबत जबरदस्तीने वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला आणि तुझ्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिले.
दरम्यान, पीडित मुलगी चार महिन्याची गरोदर राहिली. आरोपीने हा प्रकार लपवण्यासाठी मुलीवर गर्भपात करण्यासाठी जबरदस्ती केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर करीत आहेत.