Pune Crime : कुत्र्याच्या अंगावर पाणी टाकल्याच्या कारणावरुन महिलेला मारहाण, हडपसर पोलीस ठाण्यात चार जणांवर विनयभंगाचा गुन्हा..


Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाण्याच्या हंड्यात कुत्र्याने तोंड घातल्याने महिलने त्याच्या अंगावर पाणी टाकले.

याचा राग आल्याने चार जणांनी महिलेच्या मुलाला शिवीगाळ करुन दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच महिलेचे केस धरुन तिच्यासोबत अश्लील वर्तन करुन विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार हडपसर परिसरातील साडेसतरा नळी येथील दांगट वस्ती येथे मंगळवारी (ता.२०) दुपारी बाराच्या सुमारास घडला आहे.

याप्रकरणी दांगट वस्ती येथे राहणाऱ्या ४९ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दित्यानुसार दिलीप बाबुराव जाधव (वय.६६), शुभम दिलीप जाधव (वय.२८), शंभो दिलीप जाधव (वय.२४) शुभम जाधव याचा अनोळखी मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी व फिर्याद एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी यांच्या पाळीव कुत्र्याने फिर्यादी यांनी पाण्याने भरुन ठेवलेल्या हंड्यात तोंड घातले. कुत्र्याला हाकलण्यासाठी फिर्यादी यांनी कुत्र्याच्या अंगावर पाणी टाकून कुत्र्याला बांधून ठेवा असे आरोपींना सांगितले. Pune Crime

दरम्यान , याचा राग आल्याने आरोपी यांनी फिर्यादी यांच्या मुलाला शिवीगाळ करुन हाताने व दगडाने मारहाण करुन धमकी दिली. तसेच फिर्यादी यांचे केस धरून ओढत स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!