Ajit Pawar : राज्यात नेमकं काय चाललंय? आता अट्टल गुन्हेगार आसिफ दाढी अजित पवारांच्या भेटीला, फोटो व्हायरल…

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजानन मारणे याची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली. पार्थ पवार कुख्यात गुंड गजा उर्फ गजानन मारणे यांना भेटल्याबद्दल त्याला विचारणा करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते.
त्यांनी स्वत:च्या मुलास फटकारले आहे, असे अजिबात घडता काम नये, असे बजावले होते. परंतु आता स्वत: अजित पवार यांना पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या असिफ महंमद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढी जाऊन भेटला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्याने भेट घेतल्याचा फोटो समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याची बातमी समोर येऊन काही तास उलटत नाही, तो आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुण्यातील पिंपरी चिंचवडमधे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या असिफ महंमद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढीने भेट घेतल्याची बातमी समोर येत आहे.


असिफ दाढीने गुरुवारी देवगिरी बंगल्यावर जाऊन अजित पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. असिफ दाढीला राजकारणात येण्याचे वेध लागले असून, त्यासाठी एका कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी तो गेला होता. तृतिय पंथियांसाठी काम करणाऱ्या एक संस्थेसाठी तो काम करतो अशीही माहिती समोर येत आहे. Ajit Pawar
आसिफ महंमद इक्बाल शेख उर्फ दाढीची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय?
आसिफ शेख उर्फ दाढी वर पहिला गुन्हा १८८८ साली दाखल झाला. पहिला गुन्हा हा मारहाणीचा होता. पण, मारहाण करत त्याने गुन्हेगारी विश्वात पहिलं पाऊल टाकलं होतं. अगदी २०२१ पर्यंत त्याच्यावर आठ गुन्हे दाखल झालेत.
१९८८ मध्ये मारहाण करणे, १९९६ आणि २००४ साली संगनमत करून खुनाचा प्रयत्न करणे, २००७ मध्ये अपहरण करून हत्या केली, २००९ आणि २०२१ साली शस्त्राचा वापर करणे, विनापरवाना शस्त्र बाळगून कट रचने आणि २०२१ साली अंगावर धावून जात जीवे मारण्याची धमकी देणे. अशा गुन्ह्याचा यात समावेश आहे. २०११ साली पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने असिफ दाढीला त्याच्या घरातून पिस्तुलासह अटक केली होती.