Loni Kalbhor : विभाजन होऊन नवीन स्थापन झालेल्या पूर्व हवेलीतील लोणी काळभोरच्या अप्पर तहसीलदारपदी तृप्ती कोलते यांची निवड..


Loni Kalbhor : उरुळी कांचन : हवेली तहसीलदार कार्यालयाचे विभाजन होऊन नवीन स्थापन झालेल्या पुर्व हवेलीतील लोणी काळभोर अप्पर तहसिल कार्यालयाच्या तहसीलदार पदी तृप्ती कोलते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोणी काळभोर अप्पर तहसिल कार्यालयाच्या कोलते या प्रथम तहसीलदार आहेत.

महाराष्ट्र शासनाने हवेली तालुक्याचे तहसील कार्यालयाचे विभाजन करून २ नोव्हेंबर २०२३ रोजी लोणी काळभोर येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करणे बाबत शासन निर्णय काढण्यात आला आहे.

शासन निर्णय आणि अप्पर तहसीलदार व महसूल सहाय्यक पद निर्माण केले तसेच शासन राजपत्र सुद्धा ६ डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध केले यानंतर ३१ जानेवारी रोजी महाराष्ट्र शासनाने उपसचिव अजित देशमुख यांनी कोलते यांच्या नियुक्तीचे आदेश पारीत केले. त्यानुसार, तृप्ती कोलते यांची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, तृप्ती कोलते या सध्या मुंबई येथील रस्ते विकास महामंडळात तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या तेथून आता त्यांची लोणी काळभोर अप्पर तहसिल कार्यालयात त्यांची बदली झाली.

कोलते यांनी यापूर्वी वेल्हा, वाई, मुळशी येथे नायब तहसीलदार म्हणून काम केले आहे. तर सोलापूर, पुणे शहर, हवेली येथे तहसीलदार म्हणून काम केले मुळशी येथे कार्यरत असताना राज्यातील अभिलेख संगणीकरणाचा पायलट प्रकल्पाची जबाबदारी यशस्वी पुर्ण केली. यावेळी चौदा लाख कागदपत्रांचे स्कॅनिंग व संगणीकरण केले

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!