Poonam Pandey : मरणाचं ढोंग पडणार महागात, पूनम पांडेला होणार अटक?, नेमकं झालं काय..

Poonam Pandey : शुक्रवारी सकाळी मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडे हिच्या निधनाच्या वृत्ताने एकच खळबळ उडवून दिली होती. सर्व्हायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशय मुखाच्या कर्करोगाने तिचं निधन झाल्याचं त्यात म्हंटले होते.

निधनाचं वृत्त तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून दिले गेले असल्याने हे वृत्त खरं असावं असा सगळ्यांचा समज झाला होता. मात्र, शनिवारी पूनमने एक व्हिडीओ जारी करून आपण या कर्करोगाविषयी जनजागृती करण्यासाठी आपल्या मृत्युची अफवा पसरवल्याचं म्हंटले आहे. Poonam Pandey
सर्वायकल कॅन्सरने निधन झाल्याची खोटी बातमी पसरवल्यामुळे आता पूनम पांडेला अटक होऊ शकते, असे म्हटले जात आहे. मृत्यूची खोटी बातमी पसरवल्याने महाराष्ट्राच्या MLA सदस्यांनी तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पूनम पांडेला स्वत:च्या मृत्यूचा बनाव भारी पडणार आहे. २४ तासांत लेखी माफीनामा सादर करावा, अन्यथा कामबंद आंदोलन करू अशी वेस्टर्न इंडिया सिनेकामगार संघटनेची मागणी आहे. अन्यथा पूनम पांडेचा सहभाग असलेल्या कुठल्याही शूटमध्ये सहभागी न होण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पूनमने आपला कॅन्सने मृत्यू झाल्याची अफवा पसरवली होती.
पूनम पांडे विरोधात तक्रार दाखल..
मुंबईतील वकील अली काशिफ खान यांनी पूनम पांडे विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी मॅनेजर निकिता शर्मा आणि एजेंसी हॉटरफ्लायचादेखील उल्लेख केला आहे. कलम ४१७, ४२०,१२० ब आणि २४ क या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.