Poonam Pandey Death : अभिनेत्री पूनम पांडेचे कॅन्सरने निधन, इन्स्टाग्राम पोस्टमुळे उडाली खळबळ..


Poonam Pandey Death : लोकप्रिय अभिनेत्री, मॉडल पूनम पांडेचं सरव्हायकल कॅन्सरने निधन झालं आहे. तिच्या इंस्टा अकाउंटवरुन आलेल्या या बातमीमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ३२ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे.

पुनमच्या त्या इंस्टा अकाउंटवरुन तिच्या टीमनं दिलेल्या माहितीनुसार,”आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी धक्कादायक आहे. कॅन्सरशी झुंज देणारी आपली लाडकी पूनम पांडे आपल्याला सोडून गेली. संपर्कात आलेल्या सर्वांनाच तिने प्रेम दिलं आहे. आता यातून बाहेर पडायला आम्हाला थोडा वेळ द्यावा एवढी विनंती. असं त्यात लिहिलं आहे.

बोल्डनेसमुळे पुनमच्या नावाची नेहमीच मनोरंजन विश्वात चर्चा होती. तिनं गेल्या वर्षी कंगनाच्या लॉकअप नावाच्या रियॅलिटी शो मध्ये सहभाग घेतला होता. त्यातून पुनमची लोकप्रियता वाढली होती. पुनमनं अनेकदा बॉलीवूडमधील सेलिब्रेटींशी पंगा घेतल्याचे दिसून आले होते. त्यामुळे तिला नेटकऱ्यांकडून ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. Poonam Pandey Death

पूनमने २०१३ मध्ये ‘नशा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिने एका शिक्षिकेची भूमिका साकारली होती, जिचे तिच्या विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध असतात. या चित्रपटानंतरचा काळ खूप कठीण असल्याचं सांगत पूनम ‘लॉक अप’ या शोमध्ये म्हणाली होती, त्या चित्रपटानंतर मला ज्या काही ऑफर्स येत होत्या ते मी घेऊ नये असं अनेक लोक सांगू लागले.

मला अभिनय करायचं आहे, चित्रपटांमध्ये काम करायचं आहे असं मी त्यांना सांगू इच्छिते. मी उत्तम डान्सर आहे आणि अभिनेत्रीसुद्धा आहे, हे मला सिद्ध करून दाखवायचं आहे. चुकीचे निर्णय घेऊन माझी दिशाभूल झाली. पण आता मी योग्य मार्ग निवडणार आहे. असे ती म्हणाली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!