Chhagan Bhujbal : राजकारणातील सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर…


Chhagan Bhujbal : सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. शातच एक मोठी बातमी समोर आली आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच मंत्री छगन भुजबळ सध्या भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

त्यांच्या या दाव्यानंतर छगन भुजबळ यांनी प्रतिउत्तर दिल आहे. आपल्या पक्षात मला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही आणि माझी इथे घुसमटही होत नाही. असं भुजबळ यांनी स्पष्ट केल आहे.

माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, मला अजून याबाबत कोणतीच माहिती मिळाली नाही मात्र माझ्या आधी त्यांना ही माहिती कशी मिळाली हेच मला समजत नाही, भुजबळ म्हणाले आहेत. Chhagan Bhujbal

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली होती. या टीकेवरून देखील भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय गायकवाड काय म्हणाले ते काल मी पण ऐकलं. मला पण ते एकूण वाईट वाटलं.

जी भाषा त्यांनी काल वापरली ते बरोबर नाही. मी पण शिवसेनेत होतो, तुम्ही ज्या शिवसेनेत शिकला त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो, अशा शब्दांत भुजबळांनी गायकवाडांना टोला लगावला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!