Accident News : मोठी बातमी! समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात! १५ जण गंभीर जखमी….


Accident News : विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच आहे. काही केल्या या ठिकाणचे अपघात सत्र कमी होत नाही. समृद्धी महामार्गावरील अपघातात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. सध्या देखील या ठिकाणी एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

भरधाव वेगात असलेल्या खासगी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट महामार्गावरच उलटली. या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी (ता.१) रात्रीच्या सुमारास झाला आहे.

या अपघातातील जखमी लोकांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. यामधील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. अपघातग्रस्त बस नागपूर येथून पुण्याच्या दिशेने जात होती. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील डोनद लोकेशन १७३ जवळ बस आली असता, चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला आहे. Accident News

दरम्यान, या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बसमधील १५ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना कारंजा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!