Mumbai Pune Expressway : पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर प्रवास करताय? आधी ही बातमी वाचा, नियम मोडल्यास खिसा होईल रिकामा, आता CCTV ची असणार करडी नजर..


Mumbai Pune Expressway : पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवरने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आता पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे आता वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे.

तसेच पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अनेक नागरिक वाहतुकीचे नियम सर्रास धाब्यावर बसवतात. त्यामुळे भीषण अपघात घडतात. यामुळे अपघातांची ही मालिका रोखण्यासाठी आता पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

एकूण ४०० सीसीटीव्ही कॅमेरे पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर बसवण्यात येणार आहेत. येत्या १ एप्रिलपासून एक्सप्रेसवेवर ४०० नवे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास सुरूवात होत आहे. यामुळे प्रवास करताना आता काळजी घेण्याची गरज असणार आहे. Mumbai Pune Expressway

भरधाव वाहन चालवणे, सीट बेल्ट न लावणे, रस्त्याच्या कडेला गाडी थांबवणे, वाहने ओव्हरलोड करणे या सर्वांसाठी वाहनचालकांना आता अतिरिक्त दंड द्यावा लागणार आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवरून प्रवास करत असाल तर सावधान. कारण एक चूक देखील तुमचा खिसा रिकामा करू शकते. यामुळे आता पुणे-मुंबई एक्सप्रेस आता प्रवास करताना नागरिकांना काळजी घेणे गरजचे असणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!