Solapur Crime News : बापानेच केला खेळ खल्लास! विषारी पावडर पाजत मुलाला संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर…


Solapur Crime News सोलापूर : जन्मदात्या बापानेच आपल्या १४ वर्षीय मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना सोलापुरातून उघडकीस आली आहे. मुलाला थम्सअपमध्ये सोडियम नायट्रेट्ची पावडर पाजून मुलाला मारल्याची कबुली वडिलांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

विशाल विजय बट्टू असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर,विजय सिद्राम बट्टू असे मुलाची हत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, विशाल हा १३ जानेवारी रोजी सकाळपासून घरी आला नसल्याची तक्रार आई, वडील आणि नातेवाईकांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दिली होती. त्याच दिवशी रात्री ११ च्या सुमारास सोलापुरातल्या तुळजापूर नाका परिसरात एक मुलगा बेशुद्ध अवस्थेत असल्याचे पोलिसांना आढळून आले.

त्यानंतर पोलिसांनी त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.मात्र उपचारपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सकाळी विशाल बट्टू बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी लगेचच नातेवाईकांना बोलावून ओळख पटवली असता मृतदेह विशालचेच असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांना या प्रकरणी विशालचा घातपात झाल्याचा संशय होता. Solapur Crime News

त्यामुळे पोलिसांनी आधी आकस्मित मृत्यूची नोंद करत या प्रकरणाचा तपास सुरूच ठेवला होता. पोलिसांनी अनेकांची चौकशी केल्यानंतर संशयाची सुई ही वडिलांकडे जात होती. त्यातच आरोपी वडील विजय बट्टू याने पत्नी कीर्ती बट्टूकडे आपल्या हातून मोठी चूक झाल्याचे म्हटले. ही बाब लक्षात येताच कीर्ती यांनी पोलिसांना माहिती दिली.

सोलापुरातल्या जोडभावी पेठ पोलिसांनी या तात्काळ विजय बट्टू यांना ताब्यात घेतले त्यांची चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर आरोपी विजय बट्टू याने आपला कबुली जबाब दिला.

माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. विशालच्या सततच्या शाळेतील खोडकरपणाला, मोबाइलवर नको त्या गोष्टी पाहिल्याने रागाच्या भरामध्ये मुलाला थम्सअपमध्ये सोडियम नायट्रेट्ची पावडर पाजून त्याला मारले. अशी कबुली आरोपी विजय बट्टू याने दिली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!