Pune Crime : पुण्यात नेमकं चाललंय काय? आता स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू होता वेश्या व्यवसाय, २ मुलींची सुटका, गुन्हे शाखेची कारवाई…

Pune Crime : पुण्यातल्या बाणेर परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या एका वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी छापा घालून दोन तरुणींची सुटका केली आहे. तसेच दोन जणांवर गुन्हा दाखल करुन एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई बाणेर महाळुंगे रोडवरील रॉयल हमाम अँड स्पा येथे सोमवारी (ता.२९) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैद्यरित्या मुलींना स्पा च्या नावाखाली जास्त पैशाचे अमिषा दाखवून वेश्या व्यवसाय करुन घेत होते.
या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात सिमरण उर्फ वैष्णवी दिपक पवार (वय.३७ रा. पिंपळे गुरव), गुलाम दामु महाजन यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सिमरण उर्फ वैष्णवी पवार हिला अटक केली आहे. याप्रकणी सामाजिक सुरक्षा विभागाच्या महिला पोलीस हवालदार मनिषा सुरेश पुकाळे यांनी फिर्याद दिली आहे. Pune Crime

पुण्यातील पाषाण परिसरातील द्वारका निवास येथील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या रॉयल हमाम अँड स्पा सेंटर येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला समजली. त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री करुन घेतली.
त्यानंतर रॉयल हमाम अँड स्पा सेंटर येथे छापा टाकून दोन तरुणींना ताब्यात घेतले. आरोपी स्पा सेंटरमध्ये पीडित मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होते. वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात समोर आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण करीत आहेत.