Hapus Mango : हापूसची पहिली पेटी पुण्यातील बाजारात दाखल, किती मिळाला भाव? जाणून घ्या…

Hapus Mango : आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. बच्चे कंपनीपासून ज्येष्ठापर्यंत अनेकांना आंब्याची गोडी चांगलीच आवडते. त्यातच हापूस आंबा त्याच्या चवीमुळे देशात नाही तर विदेशातही भाव खातो.

हापूस, देवगड हापूस आणि केसरी आंब्याची चव अनेकांना भुरळ घालते. त्यामुळं या जातीच्या आंब्यांना हंगामात अधिक मागणी असते. म्हणूनच त्यांची किमतीही हजारोच्या घरात आहेत.
अलीकडेच पुण्यात आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे. या पेटीचा भाव एकून तुम्हीही थक्क व्हाल सक्रांतीनंतर हापूस आंबा पुण्याच्या बाजारात दाखल झाला आहे. पुण्यात आंब्याची पहिली पेटी दाखल झाली असून. ही हंगामाती पहिली पेटी दाखल झाली आहे.

तर पहिल्या मानाचा आंब्याच्या पेटीची किंमत २१ हजार रुपये इतकी आहे. म्हणजेच एका आंब्याची किंमत 440 रुपये आहे. आंबा हे फळ सर्वांचेच आवडते आहे. याला फळांचा राजा म्हणतात. Hapus Mango
पिकलेला आंबा एप्रिलमध्ये बाजारपेठेत विक्रीसाठी येतो. परंतु पुणे शहरात या हंगामातील आंब्याची पहिली पेटी आज दाखल झाली या पहिल्या मानाच्या आंब्याच्या पेटीची किंमत २१,००० रुपये होती.
पुण्यातील मार्केट यार्डमध्ये हंगामातील पहिला आंबा दाखल झाला असून त्याची विधीवत पूजा आज पार पडली आहे. यंदा एक महिना आधीच आंब्याची पहिली पेटी मार्केटमध्ये दाखल झाली असून आंब्याला पूरक वातावरण असल्याने आंबा पेटी दाखल झाली आहे.
विधिवत पूजा करत देवाला पहिला आंबा अर्पण करत पुण्यातील मार्केट यार्डमध्ये पहिल्या पेटीचा लिलाव देखील पार पडला आहे. या लिलावात पहिली मानाची आंब्याची पेटी २१ हजार रुपयांना विकली गेली आहे. बाळासाहेब कुंजीर या फळाच्या व्यापाऱ्यांनी ही मानाची पेटी विकत घेतली असून या पेटीमध्ये चार डझन आंबे आहेत.