Viral Video : विमान उड्डानास उशीर झाल्याने प्रवाशी संतापला, थेट विमानात पायलटला केली मारहाण, व्हिडिओ व्हायरल…


Viral Video : दिल्लीसह उत्तर भारतात कडाक्याची थंडी आहे. त्यामुळे धुके देखील जास्त प्रमाणात पडत आहे. धुक्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण देखल वाढत आहे. यालाच रोखण्यासाठी जर धुके जास्त आले तर फ्लाईट, बस याला उशीर होत आहे.

तसेच आता इंडिगोच्या फ्लाइटमध्ये एक घटना घडली ज्याची कोणालाच अपेक्षा नव्हती. फ्लाइटला उशीर झाल्यामुळे प्रवाशाने संतापून पायलटला मारहाण केली आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हे प्रकरण आहे.

इंडिगो फ्लाइटला उशीर झाल्यामुळे वैतागलेल्या एका प्रवाशाने वैमानिकाला धक्काबुक्की केल्याचे माहिती आहे. धुक्यामुळे उड्डाणाला विलंब होत होता, मात्र प्रवाशांना योग्य माहिती दिली जात नव्हती. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. आयजीआय पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. Viral Video

मिळालेल्या माहिती नुसार, ही घटना रविवारी संध्याकाळी ७ वाजता घडली. विमान दिल्लीहून गोव्याला जात होते. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, फ्लाइटमध्ये बसलेल्या एका प्रवाशाने विमानाच्या पायलटला उड्डाणाच्या विलंबाबाबत घोषणा करत असताना मारहाण केली.

या भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पिवळा हुडी घातलेला एक प्रवासी अचानक शेवटच्या रांगेतून धावत आला आणि त्याने पायलटला धक्काबुक्की केली. या घटनेचा तपस पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!