Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणी आता बडे आरोपी जेलबंद, आता खुनाची खरी माहिती येणार समोर

Sharad Mohol : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची भररस्त्यातच झालेल्या हत्येने खळबळ उडाली होती. शरद मोहोळच्या हत्येने अख्खं पुणं हादरलं होतं. प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून दररोज नवीन माहिती समोर येत आहे.

याप्रकरणी पुणे पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली आहे. त्यामुळे आता शरद मोहोळ खून प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्यांची संख्या १३ वर गेली आहे. Sharad Mohol
आदित्य गोळे (वय.२४), नितीन खैरे यांच्यासह आणखी एकाला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी (ता.१२) रात्री या तिघांना अटक केली आहे. या तिघांचाही या हत्येमध्ये सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी गुंड शरद मोहोळ याच्यावर दुपार दीड वाजण्याच्या सुमारास साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याने गोळ्या घालून हत्या केली होती.

त्यानंतर आता या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. शरद मोहोळचा खून करण्यापूर्वी आरोपींनी मुळशी तालुक्यातील हाडशी परिसरात गोळीबाराचा सराव केला होता. त्यावेळी आरोपी नितीन खैरे हा मुन्ना पोळेकर यांच्यासह त्या ठिकाणी हजर होता. Sharad Mohol
याशिवाय शरद मोहोळचा खून करण्यासाठी आरोपींनी एक महिन्यापूर्वीच कट रचला होता. यासाठी लागणाऱ्या संपूर्ण पैशाची सर्व व्यवस्था ही नितीन खैरे यानेच केली होती.
तर आदित्य गोळे याने हत्येसाठी वापरण्यात आलेल्या बंदुकीसाठी पैसे पुरवले होते. मोहोळचा खून करण्यासाठी रचण्यात आलेल्या कटातही तो सहभागी होता. तर तिसरा आरोपीसुद्धा फोनद्वारे आरोपींच्या संपर्कात होता. तसेच या संपूर्ण कटात देखील तो सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे.